पुणे महानगरपालिका प्रभाग रचना जाहीर

22 Aug

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०२५ साली नव्या वॉर्ड रचनेची घोषणा करण्यात आली आहे. नव्या आराखड्यानुसार शहरातील लोकसंख्या व भौगोलिक रचनेनुसार वॉर्डांचे पुनर्वाटप करण्यात आले आहे. एकूण ४१ प्रभाग यात असून एक प्रभाग पाच वॉर्डांचा करण्यात आला आहे. यामुळे अनेक भागांत वॉर्ड क्रमांक व सीमांत बदल झाले आहेत. नव्या वॉर्डरचनेत स्थानिक प्रश्न, वाढती लोकसंख्या, तसेच नागरिकांना सोयीस्कर प्रतिनिधित्व मिळावे यावर भर देण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत राजकीय पक्षांना नव्या गणिताचा विचार करून उमेदवारांची रणनीती आखावी लागणार आहे. या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण प्रभाग रचनेचे प्रभागवार नकाशे पाहण्यासाठी इथे क्लिक करा: Download PMC Wards Map 2025